परंडा / प्रतिनिधी -
भाजपाचे प्रदेश चिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्यास्कॉउट गाईड जिल्हाध्यक्ष तथा शिक्षकेत्तर खाजगी पतसंस्था परंडा येथील चेअरमन चंद्रकांत पवार सर यांच्या सहकार्याने  प्रभाग क्रमांक 5 मध्ये 221 फळभाज्या गरजूंना वाटप करण्यात आले.
 सध्या लॉकडॉउन मध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्या नुकसानाची थोडीशी झळ कमी करण्याचा प्रयत्न करत थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत तसेच गरीब कुंटूबांना मदत म्हणून येथील प्रभाग क्रमांक 5 कुऱ्हाड गल्लीमध्ये 221 बॅग फळभाज्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी कल्याणसागर फायनान्सचे चेअरमन रामकृष्ण घोडके, मनोज पवार, विजय पवार आदी उपस्थित होते.
 
Top