उस्मानाबाद /प्रतिनिधी-
संपूर्ण  देशात लाँगडाऊन सुरु आहे, त्यामुळे    शहरासह ग्रामिण भागात गोरगरीब मजुर वर्गावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यावरही मोठे संकट ओढावले आहे. याची दखल घेऊन नळदुर्ग येथील  मदरसा दारुल उलूम बहुद्देशीय सामाजिक संस्था हि गोरगरीबांच्या मदतीला धावून आली आहे. या संस्थे मार्फत उस्मानाबाद  जिल्ह्यासह शहरात  गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय संस्थेच्या सर्व पदाधीकार्यानी  घेऊन  उस्मानाबाद जिल्ह्यात  १ हजार धान्याचे किट वाटपास सुरवातही केली आहे त्यामुळे या संस्थेमुळे गोरगरीब लोकांना मोठा आधार मिळाला आहे .
दरम्यान उस्मानाबादचे   उप विभागीय पोलीस अधीकारी मोतिचंद राठोड  यांच्या हस्ते धान्याचे किट वाटप करण्यात आले. तसेच 
आज तुळजापूर तहसील कार्यालयामध्ये पन्नास गरजुसाठी अन्नधान्याचे ५०  किट तहसीलदार श्री तांदळे  यांच्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत.  समाजातील गरजू,गरीब तसेच निराधार लोकांना मदत करण्याचे आवाहन जिल्हाधीकारी यांनी केल्यामुळे हा संस्था मदत करत आहे दरम्यान 50 किट  लोहारा शहरातही वाटप करण्यात आले  रसूल भाई काकरंबा व पैगंबर भाई मसला यांच्या आर्थिक सहकार्याने हे  वाटप करण्यात आले. यापूर्वीही या संस्थेच्या माध्यमातून पाणी व्यवस्था  बोअरवेल करुन देणे, शैक्षणिक सुविधा पुरवणे,उस्मानाबाद शहरात सहारा हायस्कुल पाणी व्यवस्था  बोअरवेल करणे, काँलेजमधील सर्व धर्माच्या मुलांचे
अडचणी दुर करणे आदी सामाजीक कार्य मदरसा दावतुल उलूम बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्यातर्फे समाजातील गरजू, गरीब तसेच निराधार लोकांना आवश्यक मोफत सेवा केली जाते. याचाच ऐक भाग म्हणुन सध्या हि संस्था उस्मानाबाद जिल्ह्यात मदतीला धावून आल्याचे दिसत आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रसुल दगडू शेख, सचिव पैगंबर, जिलानी काझी कर सल्लागार शेख लतीफ व   आसीम काझी ,  बाबा फैयाजोद्दीन यांची प्रमुख उपस्थीती होती.
 
Top