कळंब /प्रतिनिधी
कळंब येथील लक्ष्मी रोड येथे िशवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन  तलसीलदार मंजुषा लटपटे, नायब तहसीलदार पठाण मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी  शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी आप्पा कापसे यांनी आमदार कैलास पाटील यांच्याशी सतत संपर्क करत केलेल्या प्रयत्नास आखीर का यश मिळले आहे.
िशवभोजन थाळी केंद्राच्या उद्घाटन समयी शहरप्रमुख प्रदीप मेटे, नगरसेवक सतीश टोणगे, युवासेना शहराध्यक्ष अजित गुरव, प्रसिद्ध व्यापारी करसन पटेल दिलीप टोणगे,  ब्रिजलाल भुतडा,  बापू जोगदंड, पञकार शिवप्रसाद बियाणी व शिवसेना पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top