उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 लॉकडाऊन व जनता कपर्यु असताना ही दारूची दुकाने उघडी ठेवून मद्य विक्री करणाऱ्या 8 बिअरबार व परमिट रुमचे परवाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. मद्याच्या पासेसच्या नोंदी न ठेवणे,परराज्यातील व गौवा निर्मित मद्य विक्री करणे शासनाच्या नियमांचे व अर्टीचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
 उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील हॉटेल पृथ्वीराज बिअरबार, टोकी येथील हॉटेल शिरीन व सुर्या बिअरबार, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील हॉटेल भक्ती बिअर बार, उमरगा तालुक्यातील डिग्गीरोड येथील हॉटेल प्राची, भूम येथील हॉटेल सचिन बार व लोहारा येथील जट्टे बिअर शॉपीचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात यापुढे जे बार व परमिट चालक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अश्याच स्वरूपाची कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केल्याने बार चालकात खळबळ उडाली आहे.

 
Top