तुळजापूर/प्रतिनिधी-
 कोरोना लाँकडाऊन पार्श्वभूमीवर मदतीचा ओघ काहीसा आटत असल्याचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आवाहनला प्रतिसाद येथील
श्री तुळजाभवानी पाळकर  पुजारी मंडळाने तिर्थक्षेञ तुळजापूरातील दीड हजार  गरजूवंताना रेशन सह आरोग्य सुविधा पुरवणारे साहित्य , तसेच शाषणाकडे सुमारे चारशे मदत निधी किट देण्याचा उपक्रमास प्रारंभ केली आहे. कोरोना(covid 19) संसर्गजन्य महामारी च्या आणि आपत्तींच्या काळात शासनाच्या आदेशानुसार आणि सामाजिक बांधिलकी या नात्याने गोर गरिब गरजूंना जीवनावश्यक वस्तूं १५०० किट वाटप, शहरात जंतुनाशक फवारणी, हँड वॉश सेवा,रक्तदान शिबीर ,मदत प्रत्येक भागात शासनाच्या परवानगीने करण्यात येत आहे.
दिनांक ९   ते   .१५ एप्रिल पर्यंत  तुळजापूर शहरातील विविध भागात जीवनावश्यक साहित्य वाटप करण्याचे काम सुरूराहणार  आहे. हे किट देताना  सर्वांनी केंद्र सरकार,महाराष्ट्र शासन,जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग,यांच्या सूचनेचे आणि नियमांचे पालन करावे, कोरोना covid19 या संसर्गजन्य रोगापासून आपले आणि आपल्या परिवाराच्या सदस्य यांची काळजी घ्यावी, घरीच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहान श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या पुजारी बांधव करीत  आहेत.
 
Top