तुळजापूर / प्रतिनिधी-
शहरातील मोकळ्या मैदानावर तोंडाला मास्क न लावता मॉर्निंग वॉक करीत असताना 56 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेवुन   त्यांच्याकडून 28 हजाराचा रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील नळदुर्ग रोड वरील हँलिपँड उस्मानाबाद रोडसह अन्य ठिकाणी ही  कारवाई शनिवार दि.25रोजी सकाळी करण्यात आली.
सदर कारवाई  उपविभागीय पोलिस अधिकारी  डॉ. दिलीप टिपरसे यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चव्हाण, पोउपनि दांडे, पोउपनि झिंजुर्डे, पोना भागवत, पोकॉ राव, पोकॉ पतंगे, पोकॉ सोनवणे यांच्या कारवाई पथकाने केली.
 
Top