तुळजापूर/ प्रतिनिधी -
 तालुक्यातील जळकोट येथील महाराजा हा़टेल समोरील शेतात तिरट नावाचा जुगार खेळणा-या पाच  जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडून - 173160  रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यात तिघे जण पळुन जाण्यात यशस्वी झाले. ही कारवाई  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने सोमवार दि 13 रोजी  दुपारी चार  वाजण्याच्या सुमारास केली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, जळकोट हे गाव जिल्हयाचा तालुक्याच्या सरहद्द वर असणारे शेवटचे गाव असुन जळकोट शिवारात महाराजा हाँटेल समोरील सुनिल छञे यांच्या शेतात काही जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. दिलीप यांना मिळताच त्यांनी तातडीने आपल्या कार्यालयाचे पोलिस पथक पाठवून छापा मारला असता तिथे विजयकुमार महादेव सुतार , शंकर सोपान जाधव , राम बाबुराव भोगे, दत्ताञय विठ्ठल चुंगे, लहु कुशाबा कदम  (सर्व रा. जळकोट )   हे तिथे मिळुन आले तर अन्य तिघेजण बसवराज  धरणे , धोडींबा कागे,  मोहन चव्हाण (सर्व रा. जळकोट ) पळुन जाण्यात यशस्वी झाले. यांच्या कडून रोख रक्कम मोटार सायकल मोबाईल जुगार साहित्य असे ऐकुण 173160 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनखाली पो.ना राऊत, पो.का. घुसिंगे,  पो.ना पवार यांनी केली . सपोनी शरदचंद्र  सुरेश रोडगे यांच्या फिर्याद वरुन वरील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Top