उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोरोना आपत्तीच्या पाश्र्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देशभरातील जनतेनी रविवारी दि. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन दुरचित्रवाणीवरुन गुरुवारी केले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील जनतेनीही हा जनता कर्फ्यू  मोठया प्रमाणात पाळून कोरोनाचा सामना करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष  तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दि.22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत जनता कर्फ्यू काटेकोर पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे जिल्हयातील जनतेनी रविवारी प्रत्येकाने आपआपल्या घरातच राहुन कामे करावी व स्वत: सोबतच इतरांचाही बचाव करण्यासाठी दृढ संकल्प करावा. तसेच जे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मदत करत आहेत. त्यांना जनतेनी साथ दयावी, प्रोत्साहन दयावे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला उस्मानाबाद जिल्हयातील जनतेनीही साथ देऊन जनतेने जनतेसाठी लागु केलेला हा जनता कर्फ्यू मोठया प्रमाणात पाळावा व हा कोरोनाचा कहर थांबवावा,असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष  तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे.

 
Top