लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील युवकांनी सामाजिक व राष्ट्रीय भान जपत जागतिक संकट बनलेल्या कोरोना या रोगाविषयी जनजागृती केली. त्यामध्ये घरोघरी जाऊन साबणाने हात स्वच्छ धुणे व दि. 22 मार्च 2020 रोजी जनता संपसाठी आग्रह, शहरातून आलेल्या नागरिकांना नोंदणीसाठी आग्रह, नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली. लोकांनी घाबरु नका व योग्य ती काळजी घ्यावी असे, आवाहन युवकांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते महादेव कारभारी यांच्याकडून 400 साबणाचे वाटप करण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक किशोर होनाजे, काशिनाथ लकडे, आप्पु भुसप्पा, महादेव भुसप्पा, लिंगेश गुंजोटे, महेश कारभारी, वैजिनाथ कारभारी, सूरज कारभारी, महेबुब पठाण, विवेक कारभारी, बसवराज गुंजोटे,धनराज गुंजोटे, अदिंनी प्रयत्न केले.
 
Top