उस्मानाबाद /प्रतिनिधी-
युवासेनेच्या वतीने घेण्यात येणारी मॉक टेस्ट २९ ते ३१ मार्च दरम्यान घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने देता येणार आहे. आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांनी या नोंदणी केली. संबंधित विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अॅड. संजय भोरे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना https://www.yuvasenacet.com/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग व कायद्याच्या पदवीला प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप कळावे तसेच काठिण्य पातळी कळून विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव व्हावा या हेतूने राज्यात मागील चार वर्षांपासून दरवर्षी युवासेनेच्या वतीने मॉक टेस्टचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे घरबसल्या टेस्टची तयारी करण्यात आली आहे.