
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर
, स्थलांतरित व बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादी लोकांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आलेली असल्याने जेवणा अभावी कोणाचेही हालअपेष्टा होऊ नये म्हणून दिनांक 30 मार्च 2020 पासून शिव भोजनाच्या प्रती थाळीचा दर हा पाच रुपये करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व शिव भोजनालयाच्या चालकांनी 30 मार्च पासून त्यांच्याकडे येणाऱ्या लाभार्थ्यांकडून प्रती थाळीला पाच रुपयाची आकारणी करावी. या बाबतचे निर्देश संबंधितांना जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांनी देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.