नळदुर्ग /प्रतिनिधी-
 वत्सला गॅस एजन्सी व नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने  शहरातील भटक्या वैदयू समाजातील  नागरिकांना पंधरा दिवस पूरेल इतके अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी तुळजापूर चे तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप जाधव, नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी  तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे, नळदुर्ग शहर शिवसेना प्रमुख संतोष पूदाले, उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, पत्रकार विलास येडगे, दादासाहेब बनसोडे,   आयुब शेख, तानाजी जाधव, विशाल डूकरे, दादासाहेब बनसोडे व वत्सला गॅसचे प्रमुख प्रा. पांडूरंग पोळे हे उपस्थीत होते.

 
Top