उस्मानाबाद/प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्ह्यातून विदेशात गेलेले ४५ जण रविवारपर्यंत (दि.२२) विमानाने जिल्ह्यात परतले आहेत. यामध्ये रविवार नोंदी घेतलेल्यांची संख्या १४ आहे. गावाकडे परतणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मुंबई-पुण्यातून गावाकडे परतलेल्यापैकी काही जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. आजवर ३४ स्वॅब नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यापैकी ४ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. हे चारही रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. मात्र, जिल्ह्यातील व अन्य शहरातून, विदेशातून आलेल्या तसेच संसर्गजन्य आजाराचा संशय असलेल्या सुमारे ६६९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनिवारपर्यंत ४७६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. रविवारी हा आकडा १९३ ने वाढून ६६९ पर्यंत गेला आहे. यामध्ये काही जणांना हॉस्पिटलमध्ये, काही जणांना शासकीय वसतिगृहात तर काही जणांना घरातच क्वारंाटन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
 
Top