१४४ कलम लागू केल्यानंतर ही लोक रस्त्यावर
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरासह जिल्हयात प्रशासनाने १४४ कलम ३१ मार्च पर्यंत लागू केले असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. १४४ कलम लागू केले असले तरी शहरात बरेच लोक रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहेत.  विशेष म्हणजे परदेश व  इतर मोठ्या शहरातून आलेल्या २०० लोकांची तपासणी आरोग्य  विभागामार्फत झाली आहे. या तपासणीचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यामुळे  विलगीकरण करून घरीच राहण्यास सांगितले आहे. १९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
शहरातील व्यापारी वर्गाने आपली बंद ठेवून प्रशासनाला संपुर्ण सहकार्य केले आहे. तसेच एसटी महामंडळ व खासगी वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे शहरातील ९० टक्के व्यवहार बंद असताना नेमके लोक कशासाठी फिरतात हे न उलघणारे कोंडे आहे.
 जिल्हासिमा बंदी आदेश लागू
उस्मानाबाद जिल्हयाच्या  सिमा तेलंगना, आध्रप्रदेश, कर्नाटक या राज्याला लागून असून या राज्यातून उस्मानाबाद  जिल्हयात इतर राज्यांतील नागरिकांनी प्रवेश करू नये, जिल्हयाच्या  सिमेवर नाका बंदी करण्यात आली आहे. जेणेकरून करोनाचा प्रसार इतर राज्यातून उस्मानाबाद  जिल्हयात होवू नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
१४४ कलमाचे  उल्लघंन
जिल्हयातील नागरी वस्तीमधील, १४४ कलम लागू केले असून, या कलमानुसार ५ पेक्षा अधिक लोक एकत्रित येवू शकत नाहीत, परंतू उस्मानाबाद शहरात अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर  विनाकरण फिरणाले अनेक नागरिक दिसून येत होते. पोलिसांनी ही परिस्थिती गेल्या दोन दोनदिवसापासून अत्यंत संयमाने हातळली आहे. कोरोना वायरस मुळे, जिल्हा प्रशासनासह पोलिसांवर जास्त ताण आल्यास पोलिसांकडून  विनाकरण रस्त्यावर  फिरणाऱ्या नागरिकांची धुलाई होण्याची शक्यता येत नाही,
भाजीपाला अत्यवश्यक
राज्य सरकारने अत्यवश्यक सेवा म्हणून  किरणा साहित्य, भाजीपाला, दुध आदी दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचा अत्यंवश्यक बाबींमध्ये समावेश् केला आहे. तरीही लोक दररोज सदर साहित्य ख्ररेदी करण्यासाठी धडपडत असल्याचे  दिसून येत आहे.
 
Top