तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील एकलव्य आश्रम शाळेतील सहा मुली मुंबई येथील दोन हाँस्पीटल मध्ये करोना रुग्णाचा सेवेत असुन त्या करोना रुग्णावर उपचार करीत आहे.
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेत पहिली पासुन ते दहावी पर्यत शिक्षण घेतलेल्या रेखा चव्हाण शितल या मुळच्या नांदेडच्या आहेत तसेच अनिता भुरा, पुजा भुरा सोलापूरच्या आहेत तर सुवर्णा सोनवणे या मुळच्या तुळजापूर शहरातील आहेत यांनी दहावी पर्यत शिक्षण यमगरवाडी येथील ऐकलव्य आश्रम शाळेत घेतले असुन पुढे त्यांनी नर्सिंग कोर्स केला आहे आता यातील दोघी फोरसी व ज्युपीटर या नामांकित हाँस्पीटल मध्ये करोना रुग्णांचे आँपरेशन सह उपचार करीत आहेत.
येथील स्टाँप मोठ्या प्रमाणात केरळ चा असल्याने येथे एक कोरोना पाँजिटीव्ह चिमुकली दाखल झाली होती तिचावर उपचार केले आहेत. या सहा मुली या हाँस्पीटल मध्ये जाँब करीत पुढील शिक्षण घेत आहेत. सध्या आम्हाला रोज चेकअप करुन च हाँस्पीटल मध्ये प्रवेश दिला जातो येथे आमची संपुर्ण काळजी घेतली जात असल्यानेच आम्ही निर्भयपणे करोना रुग्णाची सेवा करीत असल्याची या मुलींनी सांगितले
