लोहारा/प्रतिनिधी-
जागतिक महिला दिनानिमित्त सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्स उस्मानाबाद यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा  स्त्रीशक्ती  पुरस्काराने गौरव करण्यात आला.
 या कार्यक्रमामध्ये शांता अमृत सलगर, प्रमिला आनंदराव देशमुख, वर्षा कमलाकर चौधरी, डॉ. शोभा तुकाराम लोखंडे, डॉ. राजलक्ष्मी रविराज  गायकवाड, अनिता अनंतराव पाटील,  श्रुतिका दत्तात्रय हाजगुडे (पाटील), श्रीमती गोदावरी डांगे, बाबई उर्फ सुजाता लक्ष्मण चव्हाण, अँड. ज्योती दिनकर बडेकर, सुप्रिया शिवाजी पौळ, तेजश्री धर्मराज पाटील, सविता शहाजी जाधव, संगीता महेश पाटील, शूभदा अशोक पोतदार, किरण राजेंद्र चौधरी व  शाहीन अजीम शेख आदी महीलांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका व कवयित्री कमलाताई नलावडे होत्या तर प्रमुख म्हणुन महसूल अधिकारी दिलीप देशमुख, डॉ. रमेश दापके - देशमुख, शकुंतला रमेश दापके - देशमुख, आयोजक डॉ.वसुधा दिग्गज दापके - देशमुख, डॉ.दिग्गज दापके देशमुख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास दादासाहेब कोरके, पत्रकार इकबाल मुल्ला, प्रा. अभिमान हंगरगेकर, डॉ. अर्शद रजवी, विमल पानसे, बालाजी कानवटे, प्राचार्य शहाजी जाधव, विकास घोडके यांच्यासह शहरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन मयुरी शेळके यांनी केले.

 
Top