लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी.एस. एस.कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुलींसाठी फॅशन डिझायनिंग प्रमाणपत्र कोर्सची सुरुवात करण्यात आली.
 कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत  मुलींचे शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय, लातूर व बी. एस. एस. कॉलेज, माकणी  यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुलींना रोजगार बाबत स्वावलंबी करण्यासाठी आणि महाविद्यालयाच्या मुलींच्या अंगी व्यवसाय कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात फॅशन डिझाईनच्या प्रमाणपत्र कोर्सची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.एच. एन.रेडे, महिला सबलीकरण कक्षाच्या समन्वयक प्रा.सौ.आर.यु.चोचंडे, प्रशिक्षक  प्रा.सुवर्णा शिंदे यांनी उपस्थित राहुन मुलींना या कौशल्य विकास प्रमाणपत्र कोर्सचे महत्व समजावून सांगितले.

 
Top