उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री  यशोमती ठाकूर  यांची भेट घेवून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राज्यातील शासकीय शाळेत सर्व विद्यार्थींनीना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली.
युवती व तरूणींच्या आरोग्य प्रश्नावर आज अधिक लक्ष देण्याची व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आज स्त्रीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महिलांना अॅनिमिया, ब्रीस्ट कॅन्सर, एचबी कमतरता असत, आशा वेळी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक सक्षम पाऊल उचलण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदन देते समयी यावेळी प्रदेशाध्यक्ष  सक्षणा सलगर, राज्यातील पदाधिकारी दिव्या भोसले, कल्पिता पाटील, अश्विनी बांगर, स्नेहल शिंगारे, श्रेया भोसले, पूजा लाड आदींची उपस्थिती होती.

 
Top