उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें)गावात 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दि.11मार्च रोजी जि.प शाळा व ग्रामपंचायत कार्यालय टाकळी(बें)यां‘या वतीने केंद्रीय जि.प.शाळा कनगरा अंतर्गत शैक्षणिक व सांस्कृतिक बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभाला अस्मिताताई कांबळे (जि.प.अध्यक्षा उस्मानाबाद,  सौ.टेकाळे मॅडम (महिला व बालकल्याण सभापती जि.प.उस्मानाबाद), सौ.हेमलता चांदणे (सभापती पं.स.उस्मानाबाद), श्रीमती दिवाने(गटविकास अधिकारी पं.स.उस्मानाबाद), सविता इंगळे (पं.स.सदस्या उस्मानाबाद), आशाबाई दत्ताञ्य सोनटक्के (सरपंच टाकळी (बें),  संगिता राजा जगताप ( ग्रा.पं.सदस्या टाकळी) या महिला अधिकारी व पदाधिकारी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
बालमहोत्सव समारंभाचे उदघाटन झाल्यानंतर या महिलांनी भर उन्हांत टाकळी येथील गावातील व गावालगतच सुरू असलेल्या शेतरस्त्याची व गावापासून साडे तीन किलोमिटर अंतरावर टाकळी शिवारातील फॉरेस्ट जवळील तळ्यालगत  सार्वजणिक पीण्या‘या पाण्या‘या विहिरीचे खोदकाम चालू आहे त्या विहिरी‘या कामाची पाहाणी या महिला कोकप्रतिनीधी व अधिकारी असणा—या महिलांनी केली या विहिरीची पाईपलाईन गावापर्यंत कशी पूर्णत्वाला न्यायची याचे मार्गदर्शन जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी सरपंच सौ.आशाबाई सोनटक्के, व ग्रामपंचायत सदस्या सौ.संगिता जगताप या महिला लोकप्रतिनिधींना केले.
यावेळी सुधाकर गुंड गुरूजी,दत्ताभाऊ सोनटक्के,पीरसाब शेख उपसरपंच,प्रा.राजा जगताप,वर्धमान शीरगीरे ग्रा.पं.सदस्य,दादा जाधव,डी.पी.गुरव ग्रामसेवक उपस्थित होते.
 
Top