तुळजापूर/प्रतिनिधी-
विज्ञान परीक्षा संघटन, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत  दि.5 डिसेंबर 2019   रोजी  आंतरराष्ट्रीय गणित परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये नवोदय विद्यालयातील 25 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा वेगवेगळ्या गटांमध्ये घेण्यात आल्या होत्या.
स्पर्धेत वैष्णवी भोसले, योगेश भोजने, संस्कार जोशी, प्रथमेश साबळे या विद्याथ्र्यांनी वेगवेगळ्या गटात सुवर्णपदक मिळवून  विद्यालयाचा गौरव वाढविला. यशस्वी विद्याथ्र्यांना एम.एन.गुंड , वैभव कुलकर्णी, वानखेडे पी.एफ यांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले. याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य के.वाय.इंगळे यांनी अभिनंदन करून कौतुक केले. तसेच या विद्याथ्र्यांचा सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

 
Top