उमरगा/प्रतिनिधी-
 उमरगा चौरस्त्या जवळील एचपी पंपासमोर मोटरसायकल व कारची धडक बसून झालेल्या अपघातात एक ठार तर एकजण जखमी झाला आहे. जखमींला उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या मोहीणीचा दोन दिवसांनी साखर पुडा होता साखर पुड्याच्या खरेदी साठी उमरग्याला येत आसताना हा अपघात झाला.
  या बाबत माहिती अशी की शनिवार दि.14 ला दुपारी साडेबारा वाजता कोराळ येथील  राहुल  राजाराम चोपडे  (24), मोहीणी राजाराम चोपडे (20) हे दोघेजण बहिण भाऊ मोटरसायकलवरून (क्र. एम.एच 13 बिजी 2994) चौरस्ता येथील स्वामी यांच्या पंपावर तेल घालून उमरगा शहराकडे येत असताना कार (क्र. एम.एच 17 ए.जी 500) ने धडक दिल्याने.  मोहीणी चोफडे  हीचा जागीच मृत्यू झाला तर राहुल चोपडे  जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले. मृत मोहीणीचा दोन दिवसांनी साखर पुडा होणार असल्याने दोघं बहिण भाऊ  सामान खरेदी साठी उमरग्याला येत आसताना हा अपघात झाला.  या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top