|
उस्मानाबाद/प्रतिनिधी -
कनगरा केंद्रांतर्गत टाकळी (बे.) ये
थे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय समूहनृत्य स्पर्धेत बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांच्या संघाचा पहिला क्रमांक प्राप्त करत स्पर्धत बाजी मारली. त्यानंतर या यशस्वी संघाचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेळके, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी माने, उपाध्यक्ष मतिन शेख, सदस्य राजकुमार परदेशी, वासुदेव काशिद, सैफन शेख, गौस बौडीवाले, मुख्याध्यापक तात्याराव गुजर, गणपत राऊत, प्रमोद हुग्गे, विनायक बनसोडे, सुधीर गायकवाड, पद्मिन वाघमारे, ज्योती साकोळे, आरती करपे, कल्पना कोळी तसेच. यावेळी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
