| वाशी/प्रतिनिधी- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत दुकान उघडे ठेवणाऱ्या वाशी शहरातील तीन दुकानांवर सोमवारी (दि.२३) पोलिसांनी कारवाई करत तिघांवर गुन्हे दाखल केले. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूची दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाला डावलून शहरातील पारा चौक भागात निवृत्ती सोपान काळे यांनी त्यांच्या ताब्यातील हार्डवेअरचे दुकान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतुल राम वडतीले याने बेंगलोर अय्यंगार नावाची बेकरी तर सरमकुंडी फाटा येथे मोहन परमानंद मेहता यांनी त्यांच्या ताब्यातील साईप्रसाद हॉटेल उघडे ठेवत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने वरील तीनही दुकानदाराविरोधात वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. |