उस्मानाबाद /प्रतिनिधी- जि ल्हयातील सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करिता नागरिकांची गर्दी मोठया प्रमाणात होते व या ठिकाणी दस्त नोंदणीच्या कामकाजासाठी बायोमेट्रीक यंत्रणेचा वापर केला जात असल्याने कोरोना विषाणुचा (COVID-19) प्रादुर्भाव होऊ शकतो. याकरिता प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून जिल्हयातील सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी -1 कार्यालयामध्ये दस्त नोंदणीचे काम दि.31 मार्च-2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारित केलेले आहेत, असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
तसेच स्थानिक व्यवस्था पाहून कोणतेही कार्यालय बंद न ठेवता कार्यालयातील 5 टक्के कर्मचा-यांनी उपस्थित राहावे, असेही त्यांनी सूचित केले आहे.