नळदुर्ग /प्रतिनिधी-
 कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहून येथील प्रतिष्ठीत नागरीक संजय विठठल जाधव व गणेश दिलीप मोरडे यांच्या वतीने पालिका कर्मचाऱ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले आहे. तर पालिकेतील कर्मचारी व नागरीकांना पालिकेत येताना ते हात स्वच्छ धुवन यावेत यासाठी पालिकेच्या प्रवेशव्दारासमोरच हात धुवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत येणारा कर्मचारी व नागरीक आता कोरोना विषाणूच्या प्रसार होवू नये म्हणून हात धुवण्याची काळजी घेत आहेत
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणू मोठया प्रमाणात झपाटयाने वाढत आहे, त्या पाश्र्वभूमीवर या विषाणूची बाधा शहरात होवू नये यासाठी पालिका प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहेत. परंतु पालिकेत येणाऱ्या नागरीकांना ही याची दक्षता घ्यावी लागणार आहे म्हणून पालिकेत आता प्रत्येक नागरीकांनी येताना प्रेवशव्दारा समोर असलेल्या वॉश बेसीनमध्ये हात धुवून यावे लागणार आहे. हा नियम आता नागरीकांसह पालिका कर्मचा-यांना ही लागू होणार आहे. दरम्यान याचे उदघाटन पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड व कार्यालयीन अधिक्षक श्री कुंभार यांनी हात धुवून केले आहे. त्याच बरोबर आज पालिकेत कामकाजाला सुरुवात करण्या आगोदर सर्वच कर्मचा-यांनी हात धुवून पालिकेत प्रवेश केला आहे.
त्याच बरोबर शहरातील नागरीकांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना कोरोनाची लागण होवू नये म्हणून शहरात औषधांची फवारणी करुन नागरीकांना स्वच्छतेचा संदेश देणा-या पालिका कर्मचा-यांना नळदुर्गमधील प्रतिष्ठीत नागरीक संजय विठठल जाधव व गणेश दिलीप मोरडे यांच्या वतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात आले आहे. सगळया पालिका कर्मचाऱ्यांना यावेळी मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनायक अहंकारी, सुनिल गव्हाणे, सन्नी भूमकर, गणेश मोरडे, संजय विठठल जाधव, पत्रकार विलास येडगे, अमर भाळे, मारुती खारवे, दादासाहेब बनासोडे, पालिका कर्मचारी मुनीर शेख, ज्योती बचाटे, खलील शेख, मुश्ताक पटेल, तानाजी गायकवाड, आण्णाराव गायकवाड, बाबा डुकरे, सुरज गायकवाड, प्रविण चव्हाण, मुकूंद भूमकर, शहाजी येडगे, फुलचंद सुरवसे, आंबादास व्हगाडे, खंडेराव नागणे, राजेंद्र रोमण, अजय काकडे, सुशात भालेराव आदीसह इतर कर्मचारी उपस्थीत होते.
दरम्यान शहररातील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आरंभ सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील सर्व व्यापारी बांधवांना कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोफत मास्कचे वाटप करण्यात आले आहे. त्यांच्याकडून व्यापारी, बँक, शहररातील सर्व रुग्णालय आदी ठिकाणी मास्कचे वाटप करण्या बरोबरच पालिका कर्मचाऱ्यांना ही मोफत मास्कचे वाटप करण्यात आले आहे. आरंभ सामाजिक संस्थेचे श्रमीक पोतदार, राहूल हजारे, सागर हजारे, विशाल डुकरे, आयुब शेख, शहर भाजपाचे अध्यक्ष पदमाकर घोडके, पत्रकार विलास येडगे, अमर भाळे आदींच्या हस्ते संपूर्ण शहरातील व्यापारी बांधवांना त्याच बरोबर शासकीय कार्यालयात आणि पालिका कर्मचारी व रुग्णालयातील कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
 
Top