लोहारा/प्रतिनिधी
कोरोना वायरस बाबत पुर्व काळजी घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनाचा तुटवडा झाले आहे, तरी पुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या भारतात, महाराष्ट्रात कोरोना वायरसने थैमान घातले आहे. याचा परिणाम आपल्या देशात महाराष्ट्रात जाणवत आहे. या कोरोणा वायरसमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भितीचे निर्माण झाले आहे. यामुळे नागरीक स्वत:होवुन कोरोना वायरसचा फैलाव रोखण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु आपल्या आरोग्य यंत्रणेकडे व बाजारपेठेत पुर्व काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेली मास्क, सँनीट्रायझर व इतर बाबीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या वस्तु लोहारा तालुक्यातील आरोग्य केंद्रात व बाजार पेठेत उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच लोहारा तालुक्यात ट्रक, छोटे वाहन धारक यांना भाडे मिळत नसल्याने मालक व वाहन चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मार्च महिना आर्थिक वर्ष संपण्याचा असल्याने  बँका, खाजगी फायनान्स, महावितरण कंपनीने सक्तीची वसुली असते. सध्या परिस्थिती चालक, मालक यांना जगणे कठीण असताना ते हप्ते कोठुन भरणार, सबंधीत विभागाला हप्ता वसुली करण्यात येवु नये, तात्काळ आदेश देण्यात याव  व ग्रामीण भागातील कांही फायनान्स कंपनीने महिलांचे गट स्थापन करुन कर्ज दिलेले आहे. ते कर्ज वसुलीसाठी गावागावात महिलांना एकत्रीत करुन बैठका घेत आहेत. अशा बैठकांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, माजी ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, उपस्थित होते
 
Top