उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जगभर खळबळ माजवून देणा-या कोरोनावर आळा घालण्यासाठी उस्मानाबाद नगर परिषदच्या वतीने स्वच्छता अभियानाबरोबरच रेल्वे स्थानक एसटी स्टॅन्ड व प्रत्येक चौकात हॅंॅन्डवॉश करण्याची व्यवस्था करून शहरात ब्रेक द चैन हे अभियान राबविणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यंानी पत्रकार परिषदेत दिली.
जगात या कोरोना वायरस मुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून, उस्मानाबाद शहरात एकही रूग्ण निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. जनतेत जनजागरण व्हावे यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेले बॅनर व कोरोना विषयी माहितीची क्लिप घंटा गाडीवर वाजविली जात आहे. बाहेरून येणा-या रूग्णांमुळे शहरात प्रसार होऊ नये यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग आणि नगर परिषद सज्ज आहेत. जर एखादा रूग्ण आढळून आल्यास त्या रूग्णाचा इतरांशी संपर्क होवू नये या दृष्टीकोनातून बे्रक द चैन हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त शहरातील प्रमुख चौकात हॅन्डवॉश करण्यासाठी पाण्याची व इतर व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डाची अतिरिक्त कर्मचारी लावून स्वच्छता केली जात आहे. त्याचप्रमाणे चार गाड्यांच्या माध्यमातून शहरात फवारणी ही केली जात आहे. शहरातील नागरिकांनी फार महत्वाचे काम असेल तरच नगर परिषदेत मध्ये यावे, नसता आपल्या नगरसेवकांशी फोनवर संपर्क साधून आपले काम करावे, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंदराजे निंबालकर यांनी केले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, अधिक्षक कुलकर्णी, केंद्रे व स्वच्छता विभागाचे कांबळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.