कळंब/प्रतिनिधी - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत देशभरात मोठ्या उस्फुर्तपणे कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला.यामध्ये व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवुन कडकडीत पाळत असून कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वच सज्ज झालेले आहेत.मात्र या कर्फ्यु मुळे पोलीस प्रशासन,बस स्थानकातील कर्मचारी आदी कर्मचा-यांची व सर्वसामान्य लोकांची गैरसोय होत होती,ती गैरसोय लक्षात घेवुन नेहमीच विविध सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणा-या कळंब शहरातील स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडी च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बस स्थानक, तसेच पोलीस प्रशासन, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी फूड पॅकेट, चहा,पाणी वाटप करण्यात आले. यावेळी कथले आघाडी चे बाळासाहेब कथले,सुमित बलदोटा,अतुल गायकवाड,सुशील बलदोटा,यश सुराणा,मनोज फल्ले व आदी उपस्थित होते.
 
Top