तुळजापूर/प्रतिनिधी-जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी 18 8कलमा नुसार तुळजापूरात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शासनाने जमावबंदीचा आदेश जारी करूनही काही लोक गल्ली बोळात रस्त्यावर थांबत असल्याने घोळका करून थांबू नये अथवा मोटरसायकलवरून कामाशिवाय घराबाहेर पडू नये उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात शासनाने जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत तरी सर्व नागरिकांना या आदेशाचे पालन करुन करोना पासुन मुक्ती मिळवावी असे आवाहन करण्यात आल्यानंतर ही विनाकारण कामाशिवाय घराबाहेर पडल्यास अथवा दुकाने उघडी ठेवल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा पो. नि गवळी यांनी दिला आहे.