तुळजापूर /प्रतिनिधी-
देशात लाँकडाऊन केल्याने  तुळजाभवानी मंदीर परिसरासह शहरातील किरकोळ विक्रेत्यांच्या कुंटुबियांचा व्यवासाय थंडावल्याने त्यांच्या कुंटुबियांना उपासमारीस सामोरे जावु लागु नये म्हणून पोलिस खाते व नगरपरिषदे मार्फत २१ दिवस पुरेल एवढया  दिवसाचे अन्नधान्य वितरीत करण्यात आले. तसेच मास्कचे वितरण व तुळजापूर खुर्द परिसरात औषधी फवारणी करण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे, मुख्याधिकारी अशिष लोकरे , नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक सुनिल रोचकरी , माजी नगरसेवक नारायण नन्नवरे , राष्ट्रवादी काँग्रेस चे अमर चोपदार,  नगरसेवक रणजित इंगळे, सज्जन जाधव  आदींची उपस्थिती होती.
 
Top