उमरगा/प्रतिनिधी-
 उमरगा तालुक्यात उमरगा, मुरूम दाळींब, येणेंगुर, तुरोरी,मुळज,आदी सर्वच गावात रविवारी दि २२ रोजी जनता कर्फ्यु पाळण्यात आला.रोडवर सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती.कोरोना चा सर्गजन्य आजाराचा सामना करण्यासाठी शनिवारी, व रविवारी दिवसभर  उमरगा शहरातील तालुक्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. 
या करिता उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,आमदार ज्ञानराज चौगुले, तहसीलदार संजय पवार,वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंडित पुरी,उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले,पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले, मेडिकल असोसिएशन चे डॉ.प्रशांत मोरे,डॉ.दीपा मोरे,डॉ डी.एस.थिटे,डॉ.उदयसिंह मोरे, आदी मान्यवर मंडळींनी पुढाकार घेतला होता.वर्दळीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस प्रशासन सर्वांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत होते.पालिस उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले,उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले सर्व शहरात फिरून गर्दी करू नका अशा सूचना देत होते.
 
Top