परंडा /प्रतिनिधी
करोना वायरसचा संसर्ग रोकण्यासाठी भाजपा परंडा शहर यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालय, दर्गा,अरबी मदरसा, कुभेकळ रोड, अरबी मदरसा, एस.टी.स्टॅड रोड वर कांही मुलांना हॅण्डवॉश वाटप करुन या आजाराचा सामना करण्यासबंधी माहिती देण्यात आली.
यावेळी उप जिल्हाअधिकारी राशकर , भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, नगरसेवक अनवर लुकडे, नगरसेवक मुसा हन्नुरे, भाजपा शहराध्यक्ष अँड.जहीर चौधरी, भाजपा अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष समीर पठान, गौरव पाटील, संदिप शेळके, पै. बाळासाहेब गोडगे, सिद्दीक हन्नुरे, हुसेन हन्नुरे आदींची उपस्थीती होती.
