परंडा /प्रतिनिधी -
31 मे 2020 पर्यंत 12 वर्षे अखंडित सेवा पूर्ण झालेल्या पात्र शिक्षकांचे चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी साठीचे प्रस्ताव मागविण्याची कार्यवाही तात्काळ करून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेशीत करावे यासह विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने .मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद यांना निवेदना द्वारे करण्यात आल्या.
या निवेदनात म्हटले आहे की,जालना जि.प.च्या धर्तीवर  सीएमपी वेतन प्रणाली नुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे वेतन  कॅफो टू डायरेक्ट शिक्षकांचे खातेवर वेतन जमा करण्याची कार्यवाही करावी जेणेकरून मासिक पगार 1,2 तारखे पर्यंत होईल. चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी साठी अपात्र झालेल्या 77 शिक्षकांच्या त्रुटीची पुर्तता करून चटोपाध्याय श्रेणी तात्काळ मंजूर करणे,पदोन्नती (बढती) प्रक्रिया राबवून मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, पदवीधर विषय शिक्षकांच्या रिक्त जागा भरून शैक्षणिक नुकसान टाळणे, गट शिक्षण कार्यालय परंडा येथील कनिष्ठ साहाय्यक व अधिक्षक (ओएस) ही रिक्त पदे भरावीत, सेवा ज्येष्ठतेनुसार जिल्ह्यातील मुख्याध्यापक ते गटशिक्षणाधिकारी या पदा पर्यंतचे प्रभारी पदभार द्यावे,1 मार्च 2014 च्या शासन निर्णयानुसार व उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ रिट याचिका 3163/2020 च्या निकालान्वये वेतन व लाभ द्यावे; प्रहार शिक्षक संघटनेसोबत बैठक लावून तातडीने मागण्या पूर्ण कराव्यात आशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन आदी उपस्थित होते.

 
Top