लोहारा/प्रतिनिधी
 लोहारा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय शाखा यांच्यावतीने तीन दिवसाचा राज योग शिबिर घेण्यात आला. या तीन दिवसाचे शिबिराचे आयोजन ब्रह्मकुमारी डॉक्टर सायली मोरे यांनी केले होते. या शिबिराच्या शेवटच्या दिवशी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ध्वजारोहणाचा कार्यक्रम करून ब्रह्मा भोजनाचा कार्यक्रम घेवुन शिबीराची सांगता करण्यात आली.
 या  कार्यक्रमास राजू भाई, मोरे भाई, कुमारी कृष्ण बहिणजी, सरिता बहिणजी, ब्रह्मकुमारी डॉक्टर सायली मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आशुतोष भाई, ज्योती बहिणजी, शिवानंद शिवानंद भाई, राजू भाई, डॉ. आम्लेश्वर गारटे, डॉ. माकणे मॅडम, यांच्यासह माता, भगिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
 
Top