कळंब/प्रतिनिधी-
ऊस लागवड व पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केल्यावर एकरी 110 टन उत्पादन काढू शकतो,असे प्रतिपादन कृषी भूषण  पांडूरंग आवाड यांनी केले.
रोटरी क्लब कळंब सिटी आयोजित भव्य राज्यस्तरीय पाच दिवसीय मांजरा कृषी प्रदर्शनामध्ये दि. 4 मार्च 2020 रोजी ऊस लागवड व पाणी व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनामध्ये 62 गाय, बैल, म्हेस, शेळी याची नोंद झालेली होती. यामध्ये  गुणानुक्रमे क्रक्रमांक काढण्यात आले व त्याचा रोटरी क्लबचे अध्यक्ष हर्षदा अंबुरें, सचिव डॉ.हनुमंत चौधरी व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात  आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मुंदडा , उन्मेश पाटील, विलास मुळीक, डॉ.पानढवळे, डॉ. शेळके, डॉ. देशमुख, डॉ.दराडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 
Top