
कोरोना आजाराच्या संकटात रुग्णांनाची सेवा करण्यासाठी उमरगा शिवसेनेच्या वतीने दोन मोफत रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या. त्यांचा शुभरंभआमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच तालुक्यातील रुग्णांसाठी शिवसेनेच्या वतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून रुग्णांनी काहीही अडचण आल्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी केले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, गटनेते संतोष सगर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, रत्नकांत सगर, योगेश तपसाळे, शरद पवार, सादिक कारचे, सचिन जाधव, संदीप चौगुले, ओम जगताप, अरुण महाकाली, अमर शिंदे आदी उपस्थित होते.