उमरगा / प्रतिनिधी-
सध्या कोरोना व्हायरसुळे जनजीवन ठप्प झाले आहे. येणारा काळ किती भयानक असेल याबद्वल सांगणे अवघड आहे. सोशल मिडीयावरून अनेक बातम्या वाचायला मिळत आहेत. येणाऱ्या काळात रक्त पुरवठा कमी पडणार अशी माहीती मिळत आहे. तालुक्यातील विवीध सामाजीक संघटनांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाचे संसर्ग वाढल्यास रक्तदान करणे अवघड जाईल त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजीत करुन येणाऱ्या काळाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे असे आवाहन शुक्रवारी (ता.२७) रोजी उमरगा रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले होते.
रोटीच्या वतीन करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतीसाद देत अनेक तरुणांनी शनिवारी (ता.२८) रोजी सकाळपासुनच रक्तदानासाठी रक्तपेढी गाठायला सुरुवात केली. महीलांनी सुध्दा रक्तपेढी गाठली. सोशल डिस्टन्सचे भान ठेवत एक-एक जण जाऊन रक्तदान केले. या आठवडयात अनेक राजकीय व सामाजीक संघटनेच्या वतीने रक्तदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी रोटरीचे अध्यक्ष विनोद देवरकर, सचिव युसुफ मुल्ला, माजी अध्यक्ष डॉ. संजय अस्वले, नितीन होळे, संजय ढोणे, प्रविण स्वामी, सुभाष वैरागकर, आदींनी पुढाकार घेतला.

 
Top