श्रमजिवी परिवाराचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
उमरगा/प्रतिनिधी-
कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, पोलिसांच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये योगदान देता यावे यासाठी श्रमजीवी परिवाराने प्रशासनास निवेदन दिले आहे. श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळातील प्राध्यापक, कर्मचारी मदत करण्यासाठी पुढे आले असून मंगळवारी याबाबत उपविभागीय अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांच्याकडे निवेदन दिले आहे.
सद्या सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. शासन, प्रशासन, सामाजिक, राजकिय संस्था आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता विशेष परिश्रम घेत आहेत. पोलिस प्रशासन व वैद्यकीय सेवेतील डॉक्टर कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखता यावा शहरी व ग्रामीण भागातील जनतेला या संसर्गजन्य आजाराची व्याप्ती स्पष्ट करता यावी. महसूल विभाग, पोलिस प्रशासन, आरोग्य विभागाला मनुष्य बळाचा उपयोग व्हावा. या सामाजिक बांधिलकीतून संस्थेचे सरचिटणीस माजी मंत्री बसवराज पाटील, अध्यक्ष विनायकराव पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर यांच्यासह संचालक मंडळाच्यावतीने तालुक्यातील विविध गावात कोरोना संसर्गजन्य आजाराची जनजागृती करून प्रादुर्भाव रोखता यावा, पोलिसांना गरज असेल तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी या स्वयंसेवकाचा उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांनी निवेदनात म्हटले आहे.