तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील आरळी बुद्ूक येथे  महोत्सव समिती व नरेंद्राचार्य सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्काराचे दि. ८ मार्च रोजी वितरण करण्यात आले. या पुरस्काराचेे वितरण  जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे,, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पत्रकार श्रीकांत कदम,  डॉ.सतीश महामुनी, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड, उपसभापती चित्तरंजन सरडे, सेवा समितीचे तालुकाध्यक्ष विजय भोसले, बबन जाधव, सरपंच ज्योतीताई पारवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध  क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा हिरकणी पुरस्कार देऊन समितीच्यावतीने गौरव करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महोत्सव समिती अध्यक्ष सुनील पारवे, उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सचिव भीमराव पारवे,कार्याध्यक्ष संजय पारवे, प्रसिद्धी प्रमुख अनिल आगलावे,एकनाथ कोळी,सुधाकर पौळ,विकास ज्योत आदींनी परिश्रम घेतले.
याचा झाला सन्मान
 गार्गी महेंद्र कावरे, निकिता चक्रधर पवार, दीपाली किरण नायगावकर,  निकिता दयानंद निर्मळे, भाग्यश्री देवकते , अर्चना रवींद्र अंबुरे,  मनीषा क्षीरसागर , श्रीमती गोदावरी क्षीरसागर,  मंदाकिनी शिंदे यांचा जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 
Top