
उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी (रहे.) यांचा उरूस रद्द करण्यात आला आहे . या उरूसात धार्मिक कार्यक्रम होणार असून सांस्कृतिक व जत्रा होणार नाही
कोरोनाचा प्रदूर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिाकरी दीपा मुधोळ-मुंडे यांनी हा निर्णय बैठकीत घेतला. जिल्हाधिकारी, वक्फ बोर्ड, उरूस कमिटी सदस्य व मुस्लिम समाज प्रतिनिधी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.हजरत ख्वाजा यांचे भक्त जगभर असून उरूसात धार्मिक विधीचे मानपान आहेत. हजरत ख्वाजा यांच्या उरूसासोबतच तिर्थक्षेत्रातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, यांच्या जत्रा, यात्रा या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या असून तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात जनजागृतीचे बोर्ड लावण्यात आले आहेत. शिवाय मंदिर स्वच्छतेचे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.