लॉकडाऊन मुळे शेतीमालाचे नुकसान;
उस्मानाबाद /प्रतिनिधी -
कोरोना संसर्गजन्य विषाणूचा फैलाव ही राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी संपूर्ण देश व राज्यात लॉकडाऊन करावे लागले आहे. लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. मात्र सर्व वाहतूक बंद असल्याने पालेभाज्या, फळे अशा नाशवंत पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.  त्यामुळे वाहतुक व विक्री व्यवस्था पुर्ववत करण्याचे आवाहन
सुजितसिंह  ठाकूर यांनी  करून  या संदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र दिले आहे.
मराठवाडयातील शेतकरी सततचा दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यामूळे त्रस्त आहे. पालेभाज्या, फळे अशी नाशवंत पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे लॉकडाऊन काळात आर्थिक नुकसान टाळण्याकरिता, जिल्हा व तालुका स्तरावर संपर्क क्रमांकासह शेतकरी मदत केंद्र सुरू करून संबंधित कृषी अधिकाऱ्याने नोंद घेवून पालेभाज्या, फळे वहातूकीसाठीचे प्रमाणपत्र देवून राज्यात जिल्हयाबाहेर वाहतूक व विकी करणे सोयीचे हाईल. आपण सर्व जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस प्रशासनास निर्देश देणे आवश्यक आहे.
तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पालेभाज्या, फळे व तत्सम जीवनावश्यक वस्तू, जेवणाचा डबा देणारे अशा घरपोच सेवा देणाऱ्यांची महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व मोठया ग्रामपंचायती यांनी भाग निहाय नोंद घेवून त्यांची संपर्क क्रमांकासह सूची करून त्यांना ओळखपत्र दिल्यास पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल.

 
Top