परंडा/ प्रतिनिधी-
परंडा तालुक्यातील रुई,दुधी येथील उल्फा नदी परिससरात परंडा महसुल विभागाने जप्त केलेल्या वाळू साठयातुन वाळूची चोरी करून वाहतुक करीत असताना दुधी येथील लिमकर यांचा वाळू ने भरलेला टॅक्टर अवैध वाळू उत्खन विभागाच्या पथकाने दि.२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पकडला असुन वाळूची चोरी करून अवैध वाहतुक करणाऱ्या टॅक्टर चा पंचनामा करून टॅक्टर पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे.
खास बाब म्हणजे सध्या कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असताना व सर्वत्र पोलिस बंदोबस्त असताना देखील खुलेआम अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतुक जोमाने सुरू आहे.महसुल विभागाने जप्त केलेल्या वाळू साठयावरच डल्ला मारणाऱ्या वाळू माफियाच्या विरोधात महसुल विभाग काय कारवाई करते या कडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.