उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या दोन सदस्यांची न्यायाधीश पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा विधीज्ञ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या सदस्य पदावर ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. मिलींद पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही विधीज्ञ मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
जिल्हा विधीज्ञ मंडळाचे सदस्य अॅॅड. उमाकांत देशमुख हे मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने जिल्हा न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवून त्यांची जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परिक्षेत अॅड. अविनाश दशरथ गोरे यांची निवड झाल्याबद्दल, महिला विधीज्ञ चंदणी राघवेंद्र बोधले व श्रेयस अविनाश मैंदरकर हे राज्य पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा विधीज्ञ मंडळाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साधना शिंदे,  महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य  अॅड. व्ही. डी. साळुंके, अॅड. मिलिंद पाटील, विधीज्ञ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास कठारे उपस्थित होते. या कार्यक्रमास न्यायिक अधिकारी व जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. राघवेंद्र बोधले, उपाध्यक्ष नंदकिशोर मैरान, शाम जावळे, सचिव प्रमोद वाकुरे, महावीर गुंड, महिला प्रतिनिधी राजश्री कोळगे, अॅड. सिद्धेश्वर जमदाडे, अॅड. सारीक मुंडे यांच्यासह विधीज्ञ मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
 
Top