तुळजापूर /प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मंदीरातील तिर्थकुंड कल्लोळ येथे स्नान करताना एका महिला भाविकाचे पाच ग्रॅम सोन्याचे झुमके पडले होते. परंतू  हे तिर्थकुंड स्वच्छ करताना सुरक्षारक्षकास ते सापडल्यानंतर सदरील महिला भाविकास ते  झुमके देण्यात आले.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हयातील भालकी तालुक्यातील गुजंरगा येथील सौ चकम्मा  सुग्रीव तांबोळकर या शुक्रवारी  दि. 13 रोजी देवीदर्शनार्थ आल्या असता त्याचे कानतील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके पडले होते. दरम्यान तिर्थकुंड कल्लोळ स्वच्छ करताना मंदीर कर्मचा-यांना तेसापडले त्यानंतर  मंदीराचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे याच्या हस्ते सुरक्षानिरक्षक कमलाकर पवार,  रामेश्वर धाकपांडे यांच्या उपस्थितीत सदर महिला भाविकास ते झूमके देण्यात आले.

 
Top