उस्मानाबाद/प्रतिनिधी-
विकास साध्य करायचा असेल तर पर्यावरणाविषयी संरक्षणाची दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. विकासाची कामे करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे मत अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य व राज्य दुष्काळ निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष प्रा. एच. एम. देसारडा यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ नोबल पुरस्कार विजेते भारतरत्न डॉ अमत्र्य सेन यांच्या वरील ‘अमत्र्य सेन अर्थशास्त्राचा मानवी चेहरा’ या ग्रंथावरील परिसंवादात भाग घेण्यासाठी देसारडा उस्मानाबाद येथे आले होते. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. अर्जुन जाधव उपस्थित होते.
प्रा. देसारडा म्हणाले की, गतवेळी भाजप सरकारकडून राज्यात जलसंधारणासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. जलयुक्त शिवार योजना, नाला खोलीकरण, रुंदीकरण अशा योजनांमध्ये जलधारण क्षमता असलेले घटक नष्ट झाले आहेत. अशी कामे करत असताना विकासाची दृष्टी समोर ठेवत पर्यावरण विषयक दृष्टीही समोर असणे गरजेचे असते. मात्र, अशी दृष्टी जोपासण्यात भाजप सरकार अपयशी ठरले होते. राज्याच्या तीन कोटी 58 लाख कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये 60 टक्के पेक्षा अधिक निधी वेतन, कर्ज फेडणे या कामासाठी वापरण्याची तरतूद आहे. परंतु, शेतामध्ये काम करणाऱ्या 52 टक्के लोकांसाठी केवळ दहा ते बारा टक्केच निधी उपलब्ध करण्यात आला आहे. वास्तविक पाहता 52 टक्क्यांच्या तुलनेत किमान 25 ते 30 टक्के तरी निधी या घटकांवर खर्च करण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे होत नाही. वास्तविक पाहता सध्याच्या अर्थव्यवस्थेला उद्योग व अन्य घटकांमुळे फटका बसलेला असताना शेतीने अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला आहे. असे असतानाही शेतांमध्ये राबणा-या 52 टक्के लोकांसाठी इतक्या कमी प्रमाणात वाट्याला निधी देणे, हे सध्याच्या महाविकास आघाडी सरकारचे चुकीचे धोरण आहे, असेही देसारडा म्हणाले.