कळंब/प्रतिनिधी -
यशवंत पंचायत राज अभियान-2019 अंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंत्रालय समोर मुंबई येथे अतिउत्कृष्ट काम करणा-या संस्था, गुणवंत अधिकारी, कर्मचा-यांचा गौरव समारंभ पार पडला. या सोहळ्यात कळंब पंचायत समिती येथे कार्यरत असलेले  विजय लांडगे यांचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने
सन्मानीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल  भगतसिंह  कोशयारी,  महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ,अब्दुल सत्तार-राज्यमंत्री ग्रामविकास व महसूल तसेच पंचायत राज व विविध विभागाचे सचिवांची उपस्थिती होती.

 
Top