
तुळजापूर /प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत गुढीपाडवा सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी कोरोना मुक्तीसाठी देवी चरणी प्रार्थना करून नववर्षाची गुढी उभारण्यात आली.
याावेेेळी तुकोजी बुवा व मंहत वाकोजी बुवा , सिध्देश्वर इंतुले मंदीराचे सेवेकरी छञे कर्मचारी संकेत वाघे, रवि गायकवाड् , पुजारी गोंविद लोंढे आदींची उपस्थीती होती.
गुढी पाडव्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेस संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते तसेच राञी देवीचा छबिना काढण्यात आला पण या सर्व धार्मिक विधी भाविकांन विना पार पडल्या .श्रीतुळजाभवानी मंदीरात आजपर्यतचा इतिहासात प्रथमच गुढी पाडवा सण भाविकाविना साजरा केला गेला,
