उस्मानाबाद/प्रतिनिधी ; 
गुढीपाडव्याला दरवर्षी शहरातील गवळी गल्ली येथे होणाऱ्या पशु पळवण्याचा कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठी परंपरा आहे.
दर गुढीपाडव्याला गवळी गल्ली येथे पशु पळवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. परिसरातील गोपालक, पशुपालक मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होत असतात. गुढीपाडवा हा मराठी नूतन वर्षारंभाचा दिवस असून हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नागरिक गृहप्रवेश करण्यासह घरे, नवीन वस्तू व वाहने खरेदी करतात. तसेच घरातील सर्वांसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कपडे घेण्यात येतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सण हा मराठी संस्कृतीशी जोडल्या गेला आहे. मराठी संस्कृतीचे दर्शन हा सण साजरा करण्यातून घडते. यावर्षी पाडव्याला म्हणजेच बुधवारी कार्यक्रम होणार होता. मात्र, हा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
 
Top