उस्मानाबाद/प्रतिनिधी-
करोनाच्या पार्श्वभूमीवर  उस्मानाबाद शहरातील  प्रभाग क्रमांक 9 मध्ये अत्याधुनिक ब्लोरिंग मशीन द्वारा नगर परिषदचे बांधकाम सभापती तथा गटनेता युवराज नळे यांनी स्वत: फवारणी  केली.
या कामी त्यांना  उपळा येथील भैय्यासाहेब देशमुख, संदीप साळुंके, नाना घाटगे,जगदिश मोदानी, राजाभाऊ कारंडे, संतोष मुळे, महेश काटे यांची मदत मिळाली.  ब्लोरिंग मशीन द्वारे फवारणी करण्याचा  प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे अशाच मशीनद्वारे संपूर्ण शहरात फवारणी करण्यासंदर्भात नगराध्यक्ष यांच्या सोबत त्यांनी चर्चा केली. त्यास नगराध्यक्षांनी ही   संमती दिली आहे.त्यामुळे लवकरच शहरातील सर्वच प्रभागात अशी ब्लोरिंग मशीनद्वारा फवारणी सुरू होईल, अशी माहिती युवराज नळे यांनी दिली.
 
Top