तुळजापूर /प्रतिनिधी-
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजापु शहरात अग्नीशमन दलाच्या गाडीतुन औषध फवारणी करुन शहर निर्जंतुक करण्याच्या कार्यास प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेची सुरूवात नगर परिषदेच्या परिसरातून करण्यात आली. त्यानंतर बसस्थानक, सावरकर, चौक, आंबेडकर चौक, भवानी रोड, महाद्वार रोड मंकावती गल्ली आदी परिसर औषध फवारणीतून निर्जंतुक करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी अशिष लोकरे, आनंद कदंले व त्या-त्या प्रभगातील नगरसेवकांसह ७० कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.

 
Top